S M L

मुंबईत साकारले जाणार 80 सत्याग्रहींचे पुतळे

Samruddha Bhambure | Updated On: Nov 10, 2013 04:54 PM IST

मुंबईत साकारले जाणार 80 सत्याग्रहींचे पुतळे

statueरोहन कदम, मुंबई

10  नोव्हेंबर : स्वातंत्र्यलढ्यातली गांधीजींची दाडी यात्रा हि आपल्या सर्वांना माहितीय. शाळेच्या अभ्यासक्रमांतूनही प्रत्येक पिढीली याची माहिती दिली जाते. मात्र या ऐतिहासीक यात्रेत सहभागी असलेल्या गांधीच्या सहका-यांवरही प्रकाश टाकणारा एक अनोखा उपक्रम आता राबवला जातोय. मुंबईच्या IIT पवई कॅम्पसमध्ये या सर्व 80 सत्याग्रहींचे पुतळे साकारले जात आहेत.

 

गांधींसोबत 1930 साली मिठाच्या सत्याग्रहात , सहभागी झालेल्या अनेक सत्याग्रहींचे पुतळे बनवण्याचं काम चालू मुंबईच्या IIT पवई मध्ये सुरू आहे. हे पुतळे बनवण्याची जवाबदारी, कला महाविद्यालयातल्या तरूण विद्यार्थींनी उच्चली आहे.

 

विशेष म्हणजे दांडि यात्रेत जे गांधीजी यांचे सहकारी होत, त्यांचे त्यावेळचे व्हिडिओ आणि फोटो बनवून, त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या छोट्या छोट्या गोस्टींचा अभ्यास करुण हे पुतळे बनळले जात आहेत.  80 पुतळे बनवण्यासाठी मुंबई बाहेरूनही कलाकार इकडे आले आहेत.

 

स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहास कलेच्या माध्यमातून जपण्याचा हा आगळा-वेगळा प्रयोग जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण होणार असुन 31 जानेवारी 2014 पासून गुजरातच्या दांडिच्या समुद्र  किनार्‍यावर या स्मारकांची स्थापना करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2013 04:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close