S M L

मोदींचे काँग्रेसवर टिकास्त्र

Samruddha Bhambure | Updated On: Nov 11, 2013 12:42 PM IST

modi in bhopalछत्तीसगढमध्ये भाजप नेत्यांवर हल्लाबोल करणारे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रविवारी नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. काँग्रेसनेच देशाचे तुकडे करुन देशाचा भूगोल आणि इतिहास बदलल्याची बोचरी टीका मोदींनी केली आहे.

नरेंद्र मोदी आज गुजरातच्या खेडामध्ये एका रुग्णालयाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. ज्या मुस्लिम कुटुंबांने हे रुग्णालय बांधले त्या कुटुंबाचे मोदींनी भरभरुन कौतूक करत पुन्हा एकदा मुस्लिम प्रेम दाखवून दिले.

मोदीने आजच्या भाषनात असं ही म्हणाले की नेहरू-गांधी परिवाराच्या सदस्यांना लगेच भारत रत्न देण्यात आलीत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल यांना खूप उशीरा भारत रत्न देण्यात आले.

"मोठ्या मोठ्या बाता मारुण सत्ता मिळत नाही" मनमोहन सिंहच्या या आरोपाला ही मोदी यांनी तोडीस उत्तर दिलं. ते म्हणाले, की पीएम बरोबर म्हणताता म्हणुणच आज तिसर्‍यांदा गुजरातच्या लोकांनी मला मुख्यामंत्री म्हणुण निवडून दिले."

छत्तीसगढमधल्या कालच्या सभेत मनमोहन सिंहच्या भूगोल- इतिहास बद्दल्याच्या आरोपाला पण आज मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले.

ते म्हणाले, " देशाच्या वाटणीला काँग्रेस जवाबदार आहे, चीननं आपली जमीन बळकावली तीही काँग्रेसच्याच राज्यात असं मोदी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2013 07:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close