S M L

बँकेतली गुंतवणूक फायद्याची ठरतेय

6 फेब्रुवारी, मुंबईऋतुजा मोरेबँक म्हणजे साठवण. आपण आपल्या आयुष्यभराची कमाई जिथे साठवतो ती विश्वासाची जागा.आज गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झालेयत. तरीही बँकेवर लोकांचा जो विश्वास आहे, तो अगदी अतूट आहे. म्हणूनच बँकेतली गुंतवणूक फायद्याची ठरत आहे. बँन्को या इटालियन शब्दापासून बँक हा शब्द तयार झाला. सन 1405 मध्ये हा शब्द पहिल्यांदा अस्तित्वात आला. बँकेची सरळसोपी व्याख्या करायची म्हणजे आपण आपल्या आयुष्यभराची कमाई जिथे साठवतो ती संस्था.सर्वसाधारणपणे बँकांच्या ठेवींचे चार प्रकार पडतात. फिक्स्ड डिपॉझिट, शॉर्ट टर्म डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट आणि करंट अकाऊंट डिपॉझिट असे हे ठेवींचे चार प्रकार आहेत. फिक्स डिपॉझिटमध्ये तुम्हाला ठराविक कालावधीसाठी पैसे ठेवावे लागतात. हा कालावधी अंदाजे एक वर्ष ते दहा वर्षांसाठी असतो. शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही कोणत्याही वेळी तुमची रक्कम काढू शकता. यासाठी ठराविक कालावधी नसतो.सेव्हिंग अकाउंन्टमध्ये तुमचा किमान बँकबॅलन्स असणं महत्वाचं आहे. करंट अकाऊन्टमध्ये सर्वसाधारणपणे मोठे बिझनेस कॉर्पोरेट पैसे गुंतवतात.या अकाउन्टमध्ये ग्राहकांना सर्विस चार्ज भरावा लागतो या डिपॉझीटवर मिऴणार्‍या व्याजदराचं गणित आखूनच त्यात गुंतवणूक करावी, असं तज्ज्ञांचं मत आहे. केवळ व्याजदराकडे न पाहता बँकेच्या स्थितीकडेही लक्ष देणं गरजेचं आहे, असं आर्थिक सल्लागार गणेश शानबाग म्हणाले.बँकेतल्या गुंतवणूकीवर अनेकांनी पूर्वापार विश्वास ठेवलाय कारण मुळात तिथं मिळणारी सुरक्षिततेची हमी आणि त्यांचा हाच विश्वास सध्याच्या मंदीच्या काळातही टिकून आहे. व्याजदर अनेकदा बदलत राहतात पण ठेवी सुरक्षित असतात यामुळेच आधुनिक गुंतवणूकीचे पर्याय फोल ठरत असताना बँकेतली गुंतवणूक फायद्याची ठरताना दिसतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2009 06:35 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2009 06:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close