S M L

व्हिएतनामलाही हैयानची धडक, मोठ्या प्रमाणात विध्वंस

Samruddha Bhambure | Updated On: Nov 11, 2013 02:58 PM IST

व्हिएतनामलाही हैयानची धडक, मोठ्या प्रमाणात विध्वंस

typhoon11  नोव्हेंबर:  फिलीपाईन्समध्ये हैदोस घातल्यानंतर हैयान टायफून आज पहाटे 120 प्र.तासच्या वेगानं उत्तर व्हिएतनामला धडकलं. या वादळाने फिलीपाईन्समध्ये दहा हजारांचा बळी घेतले असुन व्हिएतनाममध्ये आतापर्यंत पाच जण ठार झाल्याचे समजते.

 

 

व्हिएतनामच्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 6 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असुन फिलीपाईन्समध्ये 6 लाख 20 हजार जणांचे विस्थापन झाल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे.

 

ताक्लोबान या शहराला टायफूनचा सर्वात जास्त फटका बसला आहे. इथली हॉस्पिटल्स रुग्णांनी भरून वाहताहेत तर अन्न-पाणी, वीज या सुविधा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाला आजुनही यश आलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2013 10:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close