S M L

कार्तिकी महापूजेला अजित पवार गैरहजर राहणार?

Samruddha Bhambure | Updated On: Nov 12, 2013 03:36 PM IST

Image ajit_pawar.transfer.jpg769_300x255.jpg12 नोव्हेंबर : कार्तिकी एकादशीला होणारी पंढरपूरमधील शासकीय पूजा वादाच्या भोव-यात सापडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणा-या या पूजेला वारकरी संघटना आणि शेतकरी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला असून गोवंश हत्या बंदी कायदा मंजूर होईपर्यंत शासकीय पूजा होऊ देणार नाही असे वारकरी संघटनांचे म्हणणे आहे.

 

उद्या कार्तिकी एकादशी असून या दिवशी पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात शासकीय पूजा केली जाते. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही पूजा केली जाते. या पूजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या पंढरपूरमध्ये येणार आहेत. मात्र त्यापूर्वीच वारकरी संघटनेने शासकीय पूजा होऊ न देण्याचा निर्धार केला आहे. गोवंश हत्या बंदी कायदा मंजूर करावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र अद्याप हा कायदा मंजूर झालेला नाही. हा कायदा जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत पंढरपूरमधील मंदिरात शासकीय पूजा होऊ देणार नाही असा इशारा वारकरी संघटनेने दिला होता.

 

या विरोधापुढे अजित पवारांनीही नमते घेतल्याचे समजते. सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते शासकीय पूजा केली जाईल अशी शक्यता आहे. मात्र या विरोधाला मोडून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनीही कंबर कसली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला महापूजेसाठी मंदिरापर्यंत कसे आणता येईल यावर राष्ट्रवादीचे नेत्यांनी आज कार्यकत्याची गोपनीय बैठक घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2013 09:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close