S M L

कॅम्पा कोला : वीज आणि पाण्याचं कनेक्शन तोडलं

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2013 08:02 PM IST

कॅम्पा कोला : वीज आणि पाण्याचं कनेक्शन तोडलं

campa cola new12 नोव्हेंबर : मुंबईतल्या वरळीच्या कॅम्पा कोला सोसायटीवरच्या आजची कारवाई संपलीय. महापालिका कर्मचार्‍यांनी आठ फ्लॅट्सचं वीज, गॅस कनेक्शन तोडलं. या इमारतीमधील अनधिकृत मजले तोडण्याचं काम उद्यापासून सुरू होणार आहे.

आज महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सकाळी इथे पोहोचले, तेव्हा इथल्या रहिवाशांनी या पथकाला गेटवरच अडवून धरलं. अनधिकृत फ्लॅट्समधलं गॅस, पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्यात आलं. त्यापूर्वी रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं केली. आज सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्यात येतंय.

'कॅम्पाकोला' वर कारवाई

  • - कॅम्पाकोला संकुलात 7 इमारती
  • - विविध इमारतींमधले 35 मजले अनधिकृत
  • - 102 फ्लॅट्सचा समावेश
  • - इसा एकता - 6,7 आणि 8 वा मजला
  • - बी. वाय. अपार्टमेंट - 6 वा मजला
  • - मिड टाऊन अपार्टमेंट - 6 ते 20 पर्यंतचे मजले
  • - ऑकिर्ड अपार्टमेंट 6 ते 13 मजले
  • - पटेल अपार्टमेंट (अ) 6 वा मजला
  • - पटेल अपार्टमेंट (ब) 6 वा मजला
  •  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2013 08:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close