S M L

पहिल्या दिवशी भारत 157 धावांवर 2 बाद

Samruddha Bhambure | Updated On: Nov 14, 2013 06:00 PM IST

पहिल्या दिवशी भारत 157 धावांवर 2 बाद

14 नोव्हेंबर : 14 नोव्हेंबर : तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं, मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज होता तो फक्त सचिनोत्सव..वेस्टइंडिजची टीम 182 रन्सवर ऑलाऊट झाली आणि त्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या भारतीय टीमची ओपनिंग जोडीही पॅव्हेलिअनमध्ये परतली. यानंतर तो क्षण आला ज्या क्षणाची करोडो भारतीय क्रिकेटप्रेमी वाट पाहत होते. चौथ्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बॅटिंगसाठी पॅव्हेलियनमधून बाहेर स्टेडियमवर येत असताना अख्ख स्टेडियम 'सचिन..SSसचिन..SS'च्या घोषणांनी दणाणून गेलं.

sachin first run

सर्व क्रिकेटप्रेमी, दिग्गजांची उभं राहुन सचिनला मानवंदना दिली. तर वेस्टइंडिजच्या खेळाडूंनीही सचिनला गार्ड ऑफ ऑनर दिला. संपूर्ण देशाचं लक्ष सचिनवर होतं, तर सचिनचं लक्ष होतं ते फक्त बॅटिंगवर..बॅटिंगला आलेल्या सचिननं संयमी बॅटिंग करत भारताची इनिंग सावरली. सचिनच्या प्रत्येक रन्सवर प्रेक्षकांचा टाळ्या पडत होत्या. सचिन पहिल्या दिवसअखेर 38 रन्सवर नॉटआऊट राहिला. त्यात त्याने 6 चौकारही लगावले. तर सचिनच्या सोबतीला असलेल्या चेतेश्वर पुजाराने 34 धावा केल्यात. तर भारताच्या इनिंगची सुरूवात शिखर धवन आणि मुरली विजयने केली. धवनने 33 धावांवर आऊट झाला तर विजय 43 धावांवर आऊट झाला.

दरम्यान, भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या बॉलर्सनं कॅप्टन धोणीचा हा निर्णय योग्य ठरवलाय. कारण पहिल्याच सत्रात मोहम्मद शमी आणि आर अश्विननं विकेट घेत विंडीजला दोन धक्के दिलेत. तर लंच नंतर प्रग्यान ओझानं आणखी एक विकेट घेतली. मोहम्मद शमी, आर.अश्विन आणि प्रग्यान ओझाच्या भेदक गोलंदाजीपुढे विंडीजच्या खेळाडूंनी लोटांगण घातले. 180 रन्सच्या आतच विंडीजचे 9 बॅट्समननी तंबूचा रस्ता धरला. फॉर्मात असलेल्या मोहम्मद शमीनं ओपनिंगला आलेल्या ख्रिस गेलची विकेट घेत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर स्पीन बॉलर आर अश्विन आणि प्रग्यान ओझानं मधली फळी कापून काढली. अश्विननं 3 विकेट घेतल्या. अश्विननं डॅरेन सॅमीची विकेट घेत आपल्या टेस्ट कारकिर्दीतली 100वी विकेट घेतली. तर प्रग्यान ओझानं 4 विकेट घेत विंडीजला दणका दिला. आता उद्या सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष असणार आहे ते सचिनच्या बॅटिंगवर आणि सेंच्युरीवर....

आईच्या उपस्थितीत सचिनची मॅच

सचिनची ही अखेरची टेस्ट मॅच पाहण्यासाठी सचिनची आई रजनी तेंडुलकर वानखेडे स्टेडिअमवर उपस्थित आहेत. सचिनच्या आईनं आतापर्यंत स्टेडियमवर जाऊन सचिनची एकही मॅच पाहिली नव्हती. पण शेवटची मॅच पाहण्याची इच्छा त्यांनी सचिनकडे व्यक्त केली. आणि आईला ही मॅच पहाता यावी यासाठी सचिननंही आपली शेवटची मॅच मुंबईत खेळवण्यात यावी अशी विनंती केली होती. याशिवाय सचिनचे गुरु रमाकांत आचरेकर हेही मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहेत. तर सचिनची पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन यांच्यासह वानखेडे स्टेडिअमवर उपस्थित आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 14, 2013 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close