S M L

ऊस दरवाढीसाठी 'स्वाभिमानी'चे मुख्यमंत्र्यांच्या घरांबाहेर आंदोलन

Sachin Salve | Updated On: Nov 15, 2013 12:10 PM IST

Image img_194922_rajushetti_240x180.jpg15 नोव्हेंबर : उसाला 3 हजार रुपये दर देण्यात यावा या मागणीसाठी सुरू करण्यात आलेलं आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आज कराडमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे.

सरकारनं उसाला 3 हजार रुपये दर द्या, नाहीतर थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच आंदोलन करू असा इशारा अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दोन दिवसांपूर्वीच दिला होता. त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पोलीस असा संघर्ष झडण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू असल्यानं कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातले साखर कारखाने अजूनही बंद आहेत. याचा फटका उसाच्या पुढच्या उत्पादनावर होईल, असं साखरेच्या अभ्यासकांना वाटतंय.

शिवसेनाही आक्रमक

दरम्यान, ऊस दराच्या मुद्दयावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शिवसेनाही आक्रमक झालीय. शिवसेनेनं गुरूवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडमधल्या घरी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस यंत्रणेने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू केले होते. त्यामुळे शहरातल्या दत्त चौक परिसरातून फक्त तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 15, 2013 09:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close