S M L

काँग्रेसने आम आदमीचा अजेंडा ढापला -केजरीवाल

Samruddha Bhambure | Updated On: Nov 18, 2013 03:38 PM IST

Image kejriwal345634_300x255.jpg18 नोव्हेंबर : भाजप आणि काँग्रेसवर टीकेची झोड उठवणा-या आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी विरोधकांवर चोरीचा आरोप केला आहे. आम आदमी पक्षाच्या जाहीरनाम्यातील काही महत्त्वाचे मुद्दे चोरल्यचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

सोमवारी दिल्लीत आम आदमी पक्षाने निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिध्द केला.

या जाहीरनाम्याच्या प्रकाशन सोहळ्यात केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपवर आरोपांची फैरी झाडली. दिल्लीत आम आदमीच्या जाहीरनाम्यात काही अजेंड्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष आमचाच जाहीरनामा चोरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आम आदमी पक्षाला आलेल्या परकीय देणग्या चौकशीच्या फे-यात अडकल्या असतानाच यावर केजरीवालांनी भाष्य केले. आमच्या पक्षाला १० रुपयांची देणगी जरी आली तरी त्याची माहिती आमच्या वेबसाईटवर एका क्लिकवर ३ मिनीटांमध्ये उपलब्ध होते. याउलट भाजप व काँग्रेस निवडणुकीत करोडो रुपये उधळतात. हा सगळा दोन नंबरचा पैसा असून हा पैसा कुठून येतो यावर दोन्ही पक्ष कधीच माहिती देत नाही असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 18, 2013 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close