S M L

बांद्रा स्टेशन म्हणजे समस्यांचं माहेरघर

9 फेब्रुवारी बांद्राविनोद तळेकर वेस्टर्न आणि हार्बर मार्गावरचं एक महत्त्वाचं रेल्वे स्टेशन म्हणजे बांद्रा. जवळच असलेल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि अनेक गव्हर्नमेंट ऑफिसमुळे या स्टेशनवर स्थानिकांसोबतच बाहेरून कामासाठी येणा-या लोकांची मोठी गर्दी असते. पण त्यामानानं स्टेशनवरच्या सुविधा पुरेशा नाहीत. बांद्रा स्टेशनची दगडी इमारत फार जुनी असल्याने या ठिकाणी आत्ताच्या गर्दीला पुरतील एवढ्या पुरेशा सोयी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे या इमारतीची दुरूस्ती आणि विस्तारिकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. पण हे काम अगदीच मंद गतीने सुरू असल्यानं रेल्वे प्रवाशांना त्याचा त्रास होतोय. प्रवासी सांगतात, इथले ब्रिज फार लहान असल्यामुळे महिलांना चालताना खूप त्रास होतो. तसंच आता, दादर सारखेच ब्रिज बांद्रा स्टेशनवरही बांधावेत ही मागणी अनेकजण करत आहेत.या स्टेशनवर तीन फूट ओव्हर ब्रिज आहेत. पण त्यापैकी दोन ब्रिज स्टेशनच्या कोप-यात असल्याने प्रवाशी फक्त मधल्याच ब्रिजचा वापर करतात. त्यामुळे त्यावर जास्त गर्दी होते. त्यातही तो ब्रिज अरुंदही आहे. आणि मुख्य म्हणजे पूर्वेकडून येणारा स्कायवॉकही या ब्रिजवर संपतो. त्यामुळे त्यांची गर्दीही वाढते. इतर रेल्वे स्टेशनच्या समस्यांव्यतिरिक्त असलेल्या दोन समस्या म्हणजे स्टेशनच्या बाहेर नि फुटपाथवर असलेले फेरीवाले, ज्यामुळे बाहेरच्या वाहतुकीला अडथळा होतो.आणि स्टेशनच्या जागेत झालेलं अतिक्रमण. जणू या झोपड्यांवरच हे ब्रिज बांधले गेलेत. त्यामुळे स्टेशनच्या परिसरात आणि स्कायवॉकवर गर्दुल्ल्यांचा वावर असतो. रात्री उशिरा प्रवास करणा-या प्रवाशांना त्याचा त्रास होतो. या सगळ्या समस्यांचं माहेरघर बनलेल्या बांद्र्याकडे प्रशासनानं लवकर लक्ष देणं गरजेचं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2009 11:53 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2009 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close