S M L

'गोसीखुर्द'ची पाणी पातळी वाढली,15 गावं पाण्यात

Sachin Salve | Updated On: Nov 19, 2013 03:48 PM IST

Image img_224932_gosikhurddam_240x180_240x180.jpg19 नोव्हेंबर : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी अचानक वाढवल्यानं परिसरातल्या 15 गावांमध्ये पाणी शिरलंय. या प्रकल्पामुळे एकूण 85 गावांना फटका बसलाय.

पण, जलसमाधी मिळाली तरी गाव सोडणार नाही असा पवित्रा या गावांतल्या लोकांनी घेतलाय. पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातल्या 25 गावांचा संपर्क तुटलाय. तर पूर्ण क्षमतेनं पाणी साठवल्यास 85 गावातल्या 14 हजार 444 कुटुंबांना आपापलं गाव सोडावं लागणार आहे.

पुनर्वसनानंतरच धरणात पाणी साठवावं असा कायदा आहे. पण, त्याआधीच पाणी साठवून सरकार हजारो गावकर्‍यांच्या आयुष्याशी खेळ करत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केलाय.

प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या

 • - पर्यायी जागेत मूलभूत नागरी सुविधा
 • - नवीन गावठाणांत रोजगार
 • - प्रकल्पाला 30 वर्षं लागल्यामुळे कुटुंबं वाढली. वाढीव कुटुंबीयांचा प्रकल्पाग्रस्तांच्या यादीत समावेश करावा
 • - वाढीव कुटंुबीयांना नव्या गावठाणांत भूखंड
 • - कुटुंबातल्या एकाला नोकरी
 • - स्थानिकांना इंदिरा सागर जलाशयात मासेमारीचे अधिकार
 • - 2010 च्या मुख्यमंत्री पॅकेजअंतर्गत उशिरा मिळालेल्या मोबदल्यावर व्याज
 • - गोठ्यांसाठी 50 हजारांची मदत

सरकारी मदत

 • - पुनर्वसनासाठी 1200 कोटी रु.
 • - नोकरीऐवजी 2 लाख 90 हजार रु.
 • - पर्यायी शेतजमिनीऐवजी एकरी 80 हजार रु.
 • - घरबांधणी अनुदान 68,500 रु.
 • - गोठ्यासाठी 15,000 रु.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2013 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close