S M L

उदासीन खासदार

9 फेब्रुवारी मुंबईसंसदेत राज्याचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी ही त्या त्या राज्यांच्या खासदारांची असते. पण महाराष्ट्राचे खासदार राज्याच्या प्रश्नांविषयी उदासीन असल्याचं दिसत आहे. संसदेच्या अधिवेशनात महाराष्ट्राचे कोणते प्रश्न मांडले जावेत यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र या बैठकीला राज्यातले फक्त 18 खासदार उपस्थित होते.याबाबत काँग्रेसचे खा.एकनाथ गायकवाड सांगतात, अनेक खासदार आपापल्या कामानिमित्त बाहेर आहेत तर काँग्रेसचं अधिवेशन दिल्लीला होतं तिथे अनेकजण गेले आहेत. त्यामुळे अनेक खासदार गैरहजर होते असं ते म्हणाले. ह्या बैठकीत सीमाप्रश्नावर चर्चा झाली. आगामी अधिवेशनात महाराष्ट्रातील प्रश्नांसाठी सर्व खासदारांनी एकत्र यावं. प्रश्नांचं स्वरूप काय असावं या धर्त्तीवर ही चर्चा झाली. सर्व खासदारांनी एकत्र येऊन अत्यंत खेळीमेळीच्या स्वरूपात यावेळी चर्चा झाली असं ते म्हणाले.परंतु महाराष्ट्रातील खासदारांपैकी फक्त 18 खासदार या बैठकीला उपस्थित राहिले ही चिंतेची बाब आहे, असं मनोहर जोशी यांनी म्हटलंय. दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सीमाप्रश्न कोर्टात असल्याने कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2009 01:26 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2009 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close