S M L

ऊर्जा खात्यात 73 हजार कोटींचा घोटाळा : भाजप

Sachin Salve | Updated On: Nov 20, 2013 10:31 PM IST

Image img_206572_veejcopy_240x180.jpg20 नोव्हेंबर : सिंचन घोटाळ्यानंतर आणखी एक महाघोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केलाय. राज्याच्या ऊर्जा खात्यात गेल्या 10 वर्षांत 73 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप भाजपने केलाय.

दहा वर्षात दुय्यम दर्जाची कोळसा खरेदी, पायाभूत सुविधांमधील अनागोंदी, शेतकर्‍यांच्या विजेसाठी दिलेली सबसिडी आणि कमी वीज निर्मितीत हा घोटाळा झाल्याचा दावा भाजपने केलाय.

या घोटाळ्याची जवळपास 2 हजार पानांचा दस्तावेज आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांना सादर केले. भाजपच्या आरोपानंतर अजित पवारांनी अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकार्‍याकडून या प्रकरणाची चौकशी करू असं आश्वासन भाजपला दिलंय.

कसा झालाय, हा घोटाळा ?

  • पहिला मुद्दा

- दुय्यम दर्जाच्या कोळसा खरेदीत 4 हजार 867 कोटी जादा मोजले.

  • दुसरा मुद्दा

- कोट्यातला काही कोळसा नाहीसा झाल्यानं 17 हजार 979 कोटी किंमतीची कमी वीजनिर्मिती झाली.

  • तिसरा मुद्दा

- कोळशाचा उष्मांक कमी असल्यानं 3 हजार 286 कोटी रुपयांचं फर्नेस तेल खरेदी करावं लागलं

- हा खर्च अनाठायी

  • चौथा मुद्दा

- निविदा न काढता पायाभूत सुविधेची हजार कोटीची कामं काढली. पण, ती वेळेत पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे वीजगळती थांबवता आली नाही.

  • पाचवा मुद्दा

- शेतकर्‍यांच्या वीजेला अव्वाच्या सव्वा सबसिडी दाखवली.

  • सहावा मुद्दा

- ऊर्जा खात्याच्या आकडेवारीत 21 हजार 439 मेगावॅटची तफावत आढळली. त्यामुळे मुद्दल आणि व्याज धरुन 53 हजार 500 कोटी रुपयांची लूट झाली. उलट हे पैसे वीजग्राहकांच्या बिलामधून वसूल केले गेले

- अशाप्रकारे एकूण 73 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 20, 2013 08:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close