S M L

मारवाडी फाऊंडेशनचं नाव मराठी फाऊंडेशन करा -राज

Sachin Salve | Updated On: Nov 20, 2013 09:06 PM IST

Image raj_thakare_300x255.jpg20 नोव्हेंबर : महाराष्ट्रातल्या मारवाडी समाजाच्या लोकांनी चालवलेल्या मारवाडी फाऊंडेशनचं नाव बदलून मराठी फाऊडेशनं करावं, अशी सूचना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय. प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्काराच्या वितरण समारंभात ते नागपूरमध्ये बोलत होते.

मारवाडी फाऊंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतांना त्यांनी लातूरच्या किल्लारीच्या भुकंपाच्यावेळी महाराष्ट्रातील गुजराती समाजाकडून मदतीचा ओघ कमी आला आणि गुजरातमधील भूजमधील भुकंपाच्या वेळी भरघोस मदतीचा ओघ आला याकडेही राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हेही या कार्यक्रमात उपस्थित होते. ग्रामगीताचार्य श्री रामकृष्णदादा बेलुरकर यांना प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार राज ठाकरे यांच्या हस्ते प्रदान केला गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 20, 2013 08:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close