S M L

मार्ग धोक्याचा

10 फेब्रुवारी मुंबईअजित मांढरे मुंबईत विद्याविहार रेल्वेस्थानकावर रात्री एका 22 वर्षीय युवकाला रेल्वेनं धडक दिल्यानं तो गंभीररित्या जखमी झाला. विशेष म्हणजे तो जखमी झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाचा एकही कर्मचारी तिथं नव्हता, शेवटी त्याला काही प्रवाशांनीच जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये भरती केलं. पण, दोन तासानंतर त्यानं आपला प्राण सोडला.कर्नाटकातलं आपलं काम संपवून सचिन तोळपे मुंबईला घरी परत येत होता. चेन्नई एक्सप्रेसनं सचिन मुंबईला येत असताना अचानक विद्याविहार जवळ त्याचा तोल जाऊन तो गाडीतून खाली पडला. त्याने उठण्याचा प्रयत्न केला. पण त्याला शक्य झालं नाही. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्यावेळी विद्याविहार रेल्वे स्थानकावर एकही रेल्वे कर्मचारी नव्हता. म्हणून जखमी अवस्थेतील सचिनला स्थानकावरील काही प्रवाशांनी जवळच्या राजावाडी रुग्णालयात भरती केलं.गेल्या 14 दिवसांत 128 जणांना रेल्वे अपघातात आपला जीव गमवावा लागला तर 153 जण रेल्वे अपघात जखमी झाले आहेत. सचिनला रेल्वे स्थानकावरील कमलेश, राजेश, मृत्युंजय आणि भुग्गाप्पा यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला खरा पण, तो निष्फळ ठरला. पण, प्रत्येकाच्या मदतीला अशी माणसे धावून येतीलच असं नाही. त्यामुळे रेल्वेनं प्रवास करताना स्वत:ची काळजी घ्या. कारण घरी आपलं कोणीतरी वाट पहातंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2009 11:23 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2009 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close