S M L

इंदापूर : धान्य घोटाळ्याप्रकरणी अधिकारी मोकाटच

Samruddha Bhambure | Updated On: Nov 21, 2013 07:48 PM IST

Image img_79302_dhanyadaru_240x180.jpg21 नोव्हेंबर : इंदापूरमध्ये सर्वसामान्य लोकांसाठी रेशनिंग मार्फत दिल्या जाणार्‍या 600 टन धान्यावर अधिकार्‍यांनी डल्ला मारलाय. या प्रकरणी सदरील अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल होऊन दहा दिवस उलटले तरी या गुन्ह्यातील सर्व आरोपी मोकाट आहेत. अजून एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही. तसंच राजकीय पक्षही या मुद्द्यावर गप्प आहेत. त्यामुळे हा घोटाळा अधिकारी आणि राजकीय पुढार्‍यांनी मिळुन तर केला नाही ना ? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जातोय.

इंदापूर महसूल विभागातील पुरवठा निरीक्षक महेंद्र भोई, गोदामपाल योगेश खोत यांनी स्वस्त धान्य दुकानदार अशोक माने, अतुल होनराव, माऊली जगदाळे व इतर लोकांना हाताशी धरुन तब्बल 600 टन धान्याची परस्पर विक्री केली होती.

याबाबत इंदापूरचे तहसिलदार संजय पवार यांनी या कर्मचारी आणि अन्य दोषीविरोधात 7 तारखेला इंदापूरच्या पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केलाय. पण अजून एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आल नाही. दुर्देवाची बाब म्हणजे या घोटाळ्याच्या विरोधात राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते सर्व जण तोंडावर बोट ठेऊन आहेत. त्यामुळे या घोटाळ्यातील आरोपीचे हातवर पर्यंत असल्याची भावना सामान्य नागरीकांमधून व्यक्त होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 21, 2013 07:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close