S M L

आनंदला पराभवचा धक्का, कार्लसन जेतेपदापासून एक पाऊल दूर

Sachin Salve | Updated On: Nov 21, 2013 08:11 PM IST

आनंदला पराभवचा धक्का, कार्लसन जेतेपदापासून एक पाऊल दूर

world chess champ21 नोव्हेंबर : चेन्नईत सुरु असलेल्या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये नवव्या गेममध्येही विश्‍वनाथ आनंदला पराभवाचा धक्का बसलाय. मॅग्नस कार्लसननं आनंदवर मात केली. या विजयामुळे कार्लसनकडे 6-3 अशी आघाडी झाली असून जेतेपदापासून कार्लसन आता केवळ 1 पाऊल दूर आहे.

या स्पर्धेत आणखी तीन गेम बाकी आहेत, आणि तीनही गेम आनंदला जिंकावे लागतील तर कार्लसनला जेतेपदासाठी केवळ अर्ध्या पॉईंटची गरज आहे. मॅग्नस कार्लसननं सलग दोन मॅचेस जिंकल्यामुळे त्याच्याकडे 5-3 अशी आघाडी आहे. आजची मॅच जिंकून कार्लसनने 6-3 अशी आघाडी घेतली आहे.

उरलेल्या तीन गेमपैकी आनंदसाठी आता करो या मरोची परिस्थिती आहे. तरंच त्याला विश्वविजेतेपद राखता येईल.आनंदच्या कारकिर्दीतली ही सर्वात कठीण स्पर्धा ठरल्याचं मानलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 21, 2013 08:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close