S M L

सर्वपक्षीय बैठकीत ऊस दरवाढीवर 'तोड'गा नाहीच !

Sachin Salve | Updated On: Nov 23, 2013 06:01 PM IST

सर्वपक्षीय बैठकीत ऊस दरवाढीवर 'तोड'गा नाहीच !

cane prots23 नोव्हेंबर : ऊसदरासाठीची सर्वपक्षीय बैठक तोडग्याविनाच संपलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ऊसदराबाबत तोडगा निघालेला नाही. आता एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ 26 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये पंतप्रधानांची भेट घेणार आहे.

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,सहकारमंत्री, विनोद तावडे, राजू शेट्टी यांचा शिष्टमंडळात समावेश असेल. दरम्यान, ऊसदराचं आंदोलन सुरूच राहील, असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. या बैठकीनंतर मात्र राजू शेट्टींनी राष्ट्रवादी निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दबाव आहे, त्यामुळेच ते ऊसदराबाबतचा निर्णय घेत नाहीत, असा आरोप राजू शेट्टींनी केलाय.

ऊसाची पहिली उचल आणि ऊसाच्या मळीवरील निर्बंध उठवण्याबाबत विचार करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही बैठक बोलावली होती. एकीकडे ऊसदराचं आंदोलन तीव्र होत असताना साखरेचे भाव उतरल्यानं केंद्र सरकार आणि राज्य सरकारची मोठी पंचाईत झालीय. अशा वेळी शेतकरी संघटनांच्या नेत्यांबरोबर बोलणी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय.

त्यानुसार मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री,सहकार मंत्री, गृहमंत्री आर. आर. पाटील,वनमंत्री पतंगराव कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, गोपीनाथ मुंडे, रघुनाथदादा पाटील, विरोधी पक्ष नेते विनोद तावडे,शिवसेनेचे दिवाकर रावते, आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. साखर उद्योगाला मदत करण्याचं धोरण स्वीकारायचं पण ऊसाच्या दरात मात्र हस्तक्षेप करायचा नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 23, 2013 05:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close