S M L

इंदू मिलवरुन राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर सोशल 'वार'

Samruddha Bhambure | Updated On: Nov 24, 2013 06:31 PM IST

इंदू मिलवरुन राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर सोशल 'वार'

NCP24 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत वेबसाईटवरून तसंच ट्विटर अकाऊंटवरुन इंदू मिलच्या मुद्द्यावर एक सर्व्हे घेण्यात येतोय. 'डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे टाळाटाळ करत आहेत का?', असा प्रश्न या सर्व्हेमध्ये विचारला जातोय.

गेले काही दिवस इंदू मिलच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अडचणीत आणण्याच प्रयत्न करत आहेत.

आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांबद्दल असा सर्व्हे घेऊन त्यांच्या कार्यक्षमतेवर शंका घेणारे राजकारण राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष करतोय असं म्हटलं जातं आहे.या पार्श्वभूमीवर इंदू मिलच्या जागी नियोजीत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं श्रेय घेण्याची लढाई तीव्र झाली असून यात राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसवर मात करू पाहतोय अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2013 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close