S M L

मार्ग धोक्याचा

12 फेब्रुवारी उल्हासनगरप्रीती खानरेल्वेचे अपघात फक्त प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे होतात असं नाही तर, रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणाही त्याला जबाबदार आहे. याच्याच एक बळी ठरल्याआहेत उज्वला विश्वासराव. आज जरी त्या जिद्दीने उभ्या राहील्या असल्या तरी रेल्वे अपघातात त्यांनी त्यांचे दोनही पाय गमावले आहेत.उज्वला विश्वासराव सांगतात, उल्हासनगर रेल्वे स्टेशनवर ट्रेन पकडताना पाय सटकला आणि मी पडले. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी कॉलेजचे विद्यार्थी आणि स्टाफमुळे उज्वलाचे प्राण वाचले. उल्हासनगर रेल्वे स्टेशनचा प्लॅटफार्म आणि रेल्वेचा फुटबोर्ड यामधलं अंतर इतकं जास्त आहे की एक माणूस सहज यातून खाली जाऊ शकतो. उज्वलाच्या अपघातानंतर तिने रेल्वेकडून आर्थिक मदत घेतली नाही. पण या प्लॅटफार्मची उंची वाढवावी अशी विनंती केली आहे. परंतु वीस वर्ष झाली तरी ह्या प्लॅटफार्मची उंची काही वाढली नाही. हायकोर्टच्या ऑर्डरमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची ही रेल्वेच्या फुटबोर्डच्या उंचीपर्यंत वाढवावी असं म्हटलं आहे. तरीही रेल्वे प्रशासन मात्र याची दखल घेत नाही.पाय गमावल्यानंतर परत पायावर उभं राहण्यासाठी उज्वलाने तासनतास आर्टिफिशल पायावर चालण्याची प्रॅक्टिस केली. अगदी पाय-या चढण्या-उतरण्यापासून ते पडण्यापर्यंत. गेली वीस वर्ष उज्वला या परिस्थितीचा जिद्दीनं सामना करते आहे. पण खरंच यात उज्वलाची चूक होती का?रेल्वेच्या या हलगर्जीपणामुळे वर्षाला 60जणांचा अपघात होतो.आणि उज्वला सारख्या अनेकांना त्याची शिक्षा आयुष्यभर भोगावी लागत आहे.गेल्या 17 दिवसांत 171 मृत्यू आणि 182 जखमी

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2009 08:05 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2009 08:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close