S M L

कुंभमेळा: संभाजी ब्रिगेडचं साधूंना खुल्या चर्चेचं आव्हान

Sachin Salve | Updated On: Nov 27, 2013 08:35 PM IST

nashik kumbha mela27 नोव्हेंबर : नाशिकमध्ये 2015 मध्ये होणार्‍या कुंभमेळ्यावरचा 'खर्च निरर्थक की सार्थक' या विषयावरून वाद सुरू झालाय. कुंभमेळ्यासाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.

मात्र, कुंभमेळ्यासाठी एवढा खर्च करण्यास छत्रपती संभाजीराजे यांनी विरोध दर्शवला आहे. या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेडनं साधू महंतांना खुल्ल्या चर्चेचं आव्हान दिलंय.

डिसेंबरमध्ये संभाजी ब्रिगेड त्र्यंबकेश्वरला आमने सामने परिषदेचं आयोजन करणार आहे. यात ब्रिगेडचे पदाधिकारी आणि साधुमहंत आमने सामने चर्चा करणार आहेत. छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षण परिषदेत कुंभमेळ्यावरच्या खर्चाला विरोध दर्शवला होता, त्यावर हे पडसाद आता उमटू लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2013 08:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close