S M L

आशिष पेडणेकरांचा मनसेत प्रवेश

Sachin Salve | Updated On: Nov 27, 2013 10:32 PM IST

आशिष पेडणेकरांचा मनसेत प्रवेश

ashish pedanekar27 नोव्हेंबर : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली, त्यामुळे कुठे राजकीय पक्षांकडून 'ऑफर पे ऑफर' तर कुठे नाराजीचे झेंडे फडकायला लागले आहे. अशाच एका ऑफरला ठेंगा दाखवून महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलाय.

 

आशिष पेडणेकर आणि त्यांच्या समर्थकांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर जाऊन मनसेत केलाय. विशेष म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मतदारसंघांमधून काँग्रेसचे खासदार निलेश राणे यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी स्वत: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पेडणेकरांना उमेदवारी द्यायला इच्छुक होते.

 

मात्र पेडणेकरांनी सेनेच्या ऑफरला नकार देत मनसेत प्रवेश केलाय. पेडणेकरांचा मनसेत प्रवेश म्हणजे शिवसेनेला मोठा झटका असल्याचं मानलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2013 10:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close