S M L

तेजपालला कोणत्याही क्षणी अटक ?

Samruddha Bhambure | Updated On: Nov 29, 2013 09:50 AM IST

TARUN_TEJPAL_1660121f 28 नोव्हेंबर : लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुण तेजपालला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे व तेजपालच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बाजवण्यात येणार असल्याची माहिती गोवा पोलिसांनी आज गुरूवारी गोव्यात घेतलेल्या पत्रकार परिषद दिली आहे.

 

गोवा पोलिसांनी बजावलेले समन्स उशिरा मिळाले असं कारण पुढे करून तेजपालने हजर आज गाव्याच हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. पण, दिल्लीहून गोव्याला पोहोचायला लागणारा वेळ गृहीत धरूनच समन्स बजावले असल्याचे गोव्याचे पोलीस महानिरीक्षक ओ.पी. मिश्रा यांनी सांगितले. तेजपाल विरोधात पुढची कारवाई आधीच सुरू केली असल्याचंही गोवा पोलिसांनी म्हटलं.

 

तर दुसरकडे तेहेलकाच्या  व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांनी आज गुरूवारी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. घडलेला प्रकार दाबण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांचंही नाव एफआरआयमध्ये टाकलं जाण्याची शक्यता आहे. पण, शोमा यांनी सर्व आरोप खोटे असल्याचे सांगते.

 

भाजपने शोमा चौधरी यांच्या विरोधात आक्रमक निदर्शने सुरू केली आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शोमा चौधरींच्या दिल्लीतील साकेतमधल्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं केली. दिल्लीमधील भाजपचे आमदार विजय जॉली यांनी शोमा चौधरींच्या घराच्या पाटीला काळं फासले तर शोमा चौधरींना त्यांच्या घरातून बाहेर पडतानाही मज्जाव केला गेला. दरम्यान भाजपच्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा यांनी मात्र जॉली यांचा निदर्शनाचा निर्णय वैयक्तीक होता. त्या निदर्शनांचा पक्षाशी काहीही संबंध नाहीये असं ही म्हणले.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2013 07:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close