S M L

जिल्हाधिकारी केंद्रेकर यांच्या बदलीविरोधात आज बीड जिल्हा बंद

Samruddha Bhambure | Updated On: Nov 29, 2013 11:14 AM IST

Image img_231072_kendrekar34_240x180.jpgशशी केवडकर, बीड

29 नोव्हेंबर :  बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची बदली झाल्यामुळे वाद निर्माण झाला असून बदलीचा विरोध करण्यासाठी आज बीड बंदचा पुकारा करण्यात आला आहे. पारदर्शकपणे, जनतेच्या हिताची कामे करणारे अधिकारी अशी केंद्रेकर यांची प्रतिमा आहे. कार्यकाल पूर्ण होण्याआधीच बदली झाल्यामुळे अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या दबावामुळेच ही बदली झाल्याचा आरोप होतं आहे.

प्रशासकीय नियमांप्रमाणे बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची अजून 14 महिने बदली व्हायला नको होती. गेल्या 16 महिन्यांमध्ये त्यांनी जनतेच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यामध्ये राजकीय नेते दुखावले गेले.

केंद्रेकरांनी महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंकींच्या समर्थकांची माजलगाव महामार्गावरची अतिक्रमणं हटवली. चारा छावण्या सरकारी नियमांनुसार चालवण्यावर भर दिला. गेवराईचे आमदार अमरसिंह पंडित यांच्या जगदंबा शिक्षण प्रसारक संस्थेनं, बेकायदेशीर पद्धतीनं खरेदी केलेली शासकीय जमीन शासनानं ताब्यात घ्यावी, अशी शिफारस केंद्रेकरांनी आपल्या अहवालात केली होती. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीवरून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर हेही केंद्रेकरांवर नाराज होते. बीडच्या कृषी बाजार समितीमध्ये झालेल्या उडीद घोटाळ्याच्या तपासात केंद्रेकर यांनी पुढाकार घेतला होता.

सुनील केंद्रेकर आता औरंगाबादमध्ये सिडकोचे सीईओ म्हणून काम पाहणार आहेत. सत्ताधार्‍यांच्या दबावामुळेच केंद्रेकरांची बदली झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत.

यापूर्वीही केंद्रेकरांची बदली झाली होती. तेव्हा नागरिकांनी केलेल्या मोठ्या विरोधानंतर आणि आंदोलनांनंतर ही बदली रद्द करण्यात आली होती. या वेळेस् ही बीडचे नागरिक नाराज झाले असून शुक्रवारी बीड बंदचे आवाहनही करण्यात आले आहे.

 केंद्रेकरांवर नाराजी कशासाठी?

  • माजलगाव महामार्गावरची अतिक्रमणं हटवली
  • महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंकींच्या समर्थकांची अतिक्रमणं
  • चारा छावण्या शासकीय नियमानुसार चालवण्यावर भर
  • आष्टीचे आमदार सुरेश धस नाराज
  • जगदंबा शिक्षण प्रसारक संस्थेची बेकायदेशीर जमीन ताब्यात घेण्याच्या शिफारसीमुळे आमदार अमरसिंह पंडित नाराज
  • बीड जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीवरून पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर नाराज
  • बीड कृषी बाजार समितीतल्या उडीद घोटाळ्याच्या तपासावरून क्षीरसागर, पंडित नाराज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2013 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close