S M L

मंगळयान पृथ्वीकक्षेच्या बाहेर, मंगळाकडे यशस्वी झेप !

Samruddha Bhambure | Updated On: Dec 1, 2013 05:32 PM IST

mars1 डिसेंबर : भारतासाठी अभिमानाच्या आणि ऐतिहासिक असलेल्या मंगळ मोहीम आज आपल्या लक्षाकडे झेप घेतली आहे. कारण मंगळयानाचा पृथ्वीच्या कक्षेतला कालचा शेवटचा दिवस होता . काल शनिवारी रात्री मंगळयान पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पडत मंगळाच्या दिशेने हे यान प्रवास सुरू केला. पुढचे 300 दिवस हे यान मंगळाकडे 75 कोटी किलोमीटरचा प्रवास करणार आहे. मध्यरात्री 1 वाजता मंगळयानाने हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा पार केला.

300 दिवसानंतर, 24 सप्टेंबर 2014 ला हे यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल. आणि 6 महिने ते मंगळाभोवती प्रदक्षिणा करेल. जगभरात आखण्यात आलेल्या आतापर्यंतच्या मंगळ मोहिमांपैकी निम्म्या मोहिमा अपयशी झाल्या आहेच. त्यातही पहिल्याच प्रयत्नात कोणतीही मोहीम यशस्वी झालेली नाही. त्यामुळेच आता भारताच्या मंगळमोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागले आहे.

हा टप्पा यशस्वी ठरल्यानंतर आता मंगळयान पुढचे 8 महिने मंगळाच्या दिशेने प्रवास करणार आहे. त्यामुळे इस्त्रोसाठी कालची रात्र महत्त्वाची होती.

या मंगळ यानाने पृथ्वीपासून एक लाख मीटरचं अंतर पार केलंय. 5 नोव्हेंबर रोजी भारताच्या पहिल्या मंगळ यानानं यशस्वी उड्डाण केलंय. त्यामुळे मंगळ मोहिमेतला हा पहिला टप्पा भारतानं यशस्वीपणे पार केलाय. आता यापुढे 9 महिन्यांनंतर म्हणजे सप्टेंबर 2014 मध्ये हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावणार आहे.

आता 1 डिसेंबरनंतर यानाचा मंगळाकडचा प्रवास खर्‍या अर्थाने सुरू होईल. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि युरोपियन युनियन यांच्या मंगळ मोहिमा यशस्वी झाल्या आहे. तर चीन आणि जपान यांच्या मोहिमा अपयशी ठरल्यायत. त्यामुळे मार्स ऑर्बिटर यानाला मंगळाच्या कक्षेत सुखरूप दाखल करणं, हे भारतीय शास्त्रज्ञांपुढचं आव्हान असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2013 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close