S M L

लोकपाल आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही- अण्णा हजारे

Samruddha Bhambure | Updated On: Dec 1, 2013 07:33 PM IST

anna hazare_new1 डिसेंबर : जनलोकपालच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 10 डिसेंबर पासूुन राळेगण सिद्धीमध्ये उपोषण सुरू करणार आहेत. यापुढं व्यवस्था बदलासाठीही आपण आंदोलन छेडणार आहोत. देशभरात हे आंदोलन जनतंत्र मोर्चा या नावाने चालेल. तर राज्यामध्ये हे आंदोलन भ्रष्टाचार विरोधी आंदोलन न्यास म्हणून काम करेल अस अण्णांनी स्पष्ट केले.

येत्या 10 तारखेपासून अण्णा हजारे राळेगणसिद्धीमध्ये उपोषण करणार आहेत.जनलोकपाल विधेयक पारित व्हावं या मागणीसाठी हे उपोषण आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी आज राळेगणमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला राज्यातून राज्यासह देशभरातून अण्णांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

 

राज्यसभेत जो पर्यंत जनलोकपाल विधेयक मंजूर होत नाही तो पर्यंत आपलं आंदोलन सुरूच राहील असा संकल्प अण्णांनी जाहीर केला. दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्ते आता राजकीय पक्षामध्ये गेले. आता ही मंडळी आपल्या सोबत या आंदोलनात नसतील असंही अण्णांनी स्पष्टं केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2013 07:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close