S M L

'स्वाभिमानी'च्या विरोधात मनसे उतरणार रस्त्यावर

Sachin Salve | Updated On: Dec 2, 2013 06:16 PM IST

'स्वाभिमानी'च्या विरोधात मनसे उतरणार रस्त्यावर

mns vs swabhimani

'स्वाभिमानी'च्या विरोधात मनसे उतरणार रस्त्यावर

02 डिसेंबर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात आता महाराष्ट्र नवर्निर्माण सेना उतरली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरवातीला भडक आंदोलन केलं. पण उसाला पहिला हप्ता फक्त 2 हजार 650 रुपये इतका कमी मान्य करून राजू शेट्टी यांनी आंदोलन संशयास्पद रित्या मागे घेतलं, असा आरोप मनसेच्या कृषीविभागानं केलाय. या विरोधात पाच डिसेंबर रोजी ऊस दराच्या प्रश्नावर मनसे सांगलीत भव्य मोर्चा काढणार आहे.

सालाबाद प्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं याही वर्षी उसाला तीन हजारांची उचल द्यावी या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रासह राज्याभरात आंदोलन पुकारले होते. सुरूवातील मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानपर्यंत चर्चा करण्यात आली. मात्र यावर तोडगा निघाला नसल्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरले होते.

तीन दिवस स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोको, जाळपोळ आणि तोडफोड केली होती. अखेर चौथ्या दिवशी राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घेत पहिली उचल 2 हजार 650 रुपये दरावर तडजोड केली होती. राजू शेट्टींनी आंदोलन मागे घेतल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

आता या विरोधात मनसे रस्त्यावर उतरली आहे. 'स्वाभिमानी'च्या आंदोलनाच्या वेळी केलेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई या संघटनेकडून वसूल करण्यात यावी अशी मागणीही मनसेनं केली आहे. यापुढे मनसे ऊस दरासाठी आंदोलन सुरू ठेवणार आहे अशी माहिती मनसे कृषी विभागाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक सुधाकर खाडे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 2, 2013 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close