S M L

आणखी एक धान्य घोटाळा उघडकीस

Samruddha Bhambure | Updated On: Dec 3, 2013 03:09 PM IST

आणखी एक धान्य घोटाळा उघडकीस

dhanya ghotala03 डिसेंबर : देशात अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीला वेग येत असताना केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या बारामतीमध्ये धान्याचे घोटाळे उघडकीस आले आहेत. बारामतीत रेशनिंग धान्य दुकानासाठीचे गहू आणि तांदूळ गोदामातून उचलून थेट आटा मिलला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीला आला. इंदापूरमध्ये 600 टन धान्याच्या घोटाळ्यातले आरोपी अजूनही मोकाट असताना बारामतीमध्ये एक नवीन धान्य घोटाळा समोर आला आहे.

बारामतीतला रेशनिंग धान्य दुकानदार अक्षय मुथा हा गेल्या अनेक दिवसांपासून पुरवठा शाखेच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून रेशनिंग धान्याच्या सरकारी पोत्यांची अदलाबदल करून हा माल थेट बारामती परिसरातल्या आटा मिलला विकत असल्याचं उघड झाले. धान्याची अदलाबदल करताना या व्यापार्‍याला रंगेहाथ पकडण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मतदारसंघांमध्ये हे धान्य घोटाळे उघडकीला येऊ लागलेत तरी आरोपी पकडले गेले नाही. त्यामुळे या आरोपींना राजकीय आश्रय तर मिळत नाहीना असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारतायेत.अक्षय मुथा याने मेदड इथल्या शिवाजी बनकर याचे गोदाम भाड्याने घेऊन तिथे या धान्याची अदलाबदल करत असताना बारामतीचे प्रांत अधिकारी संतोष जाधव यांनी रंगेहात पकडले. इंदापूरातमध्येही सहाशे टनाचा धान्य घोटाळा उघडकीय आले आहेत. या प्रकाराला 20 दिवस झाले नाही, तोच आता बारामतीत 476 पोती धान्य मिलला नेत असताना पकडण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2013 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close