S M L

मोहन रावलेंचा विषय आमच्यासाठी संपला -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Dec 3, 2013 04:03 PM IST

Image udhav_thakare_on_balasaheb_smark453434_300x255.jpg03 डिसेंबर : मोहन रावले यांचा विषय आमच्यासाठी संपला, आता त्यावर बोलण्यासारखं काही नाही. जे कुणी बंडखोरी करतो त्याचं काय होतं ते तुम्ही पाहिलंच अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. रावले यांच्या प्रकरणावर उद्धव यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

शिवसेनेचे बंडखोर नेते मोहन रावले यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना हा दलालांचा पक्ष होत चाललेला आहे. कंत्राटदारांचा पक्ष झालाय. याला कारण म्हणजे मिलिंद नार्वेकर हा पक्षातला बडवा आहे. नार्वेकर शिवसेनेला खड्‌ड्यात घालायला निघालाय अशी जळजळीत टीका रावले यांनी केली होती. तसंच उद्धव ठाकरे कुणाला भेट देत नाही अशी टीकाही रावले यांनी केली होती.

त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर काही मिनिटातच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यावर दुसर्‍याच दिवशी प्रतिक्रिया दिलीय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच ज्यांना पक्षनेतृत्वावर विश्वास नाही त्यांनी सेनेतून खुशाल बाहेर जावं असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. रावले यांच्या प्रकरणानंतर शिवसेनेत बंडखोरी करणार्‍यांना बाहेरचा रस्ता धरावा लागतो हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 3, 2013 04:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close