S M L

नितेश राणेंनी पेडणे पोलीस स्टेशनमध्ये लावली हजेरी

Samruddha Bhambure | Updated On: Dec 4, 2013 04:36 PM IST

Image img_73302_niteshrane_240x180.jpg04 डिसेंबर : गोव्यात टोल नाक्याच्या तोडफोड प्रकरणी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी आज पेडणे पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली. मंगळवारी रात्री उशिरा नितेश राणे यांच्यासह 9 कार्यकर्त्यांपैकी इतर 5 जणांना काही अटींवर जामीन देण्यात आला. पण पुढचे तीन दिवस नितेश राणेंना पेडणे पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागणार आहे.

त्यानुसार नितेश राणे पेडणे पोलीस स्टेशनमध्ये हजेरीसाठी दाखल झाले, यावेळी त्यांच्यासोबत खासदार निलेश राणेही उपस्थित होते.

दरम्यान, इतर पाच जणांना आज म्हापसा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, नितेश राणे यांच्या अटकेचे पडसाद नवी मुंबईतही उमटले. अटकेचा निषेध म्हणून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कळंबोली जवळ एका गाडीची तोडफोड केली, तर कर्नाळ्यामध्ये एका हॉटेलजवळ थांबलेल्या 3 गाड्यांच्या काचा फोडल्या. या प्रकरणी 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय. पनवेल पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 4, 2013 03:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close