S M L

स्थानिक क्रिकेट मॅचमध्ये 15 जणांची टीम खेळवावी -सचिन

Sachin Salve | Updated On: Dec 4, 2013 04:43 PM IST

स्थानिक क्रिकेट मॅचमध्ये 15 जणांची टीम खेळवावी -सचिन

04 डिसेंबर : स्थानिक क्रिकेटच्या मॅचमध्ये 11 पैकी 15 जणांची टीम खेळवली तर बहुतेक करुन सर्व क्रिकेटर्सना संधी मिळू शकते अशी सूचना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एमसीएला केलीय. संधी मिळून अपयशी ठरणं ही गोष्ट मान्य केली जाऊ शकते, पण ज्यांना संधीच मिळत नाही आणि अपयशी ठरवलं जातं त्यांच्यावर अन्याय होतो असंही सचिन म्हणाला.

सचिन तेंडुलकरचा मंगळवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सत्कार केला गेला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सचिनच्या हस्ते शरद पवार इनडोअर क्रिकेट ऍकॅडमीचं उद्घाटन केलं गेलं. तसंच सचिनचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा एमसीएनं सत्कार केला.

तर हॅरिस शिल्ड आणि कांगा लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पृथ्वी शॉ आणि मुनीर खानचा  सचिनच्या हस्ते सत्कार केला गेला. यानंतर बोलताना सचिननं एमसीएला काही सूचना केल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 4, 2013 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close