S M L

अशोक चव्हाणांच्या अडचणीत वाढ

Sachin Salve | Updated On: Dec 7, 2013 04:53 PM IST

Image img_235672_ashokchavanaadrshscam_240x180.jpg07 डिसेंबर : हिवाळी अधिवेशाच्या तोंडावरच आदर्श सोसायटी घोटाळ्यातील आरोपी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या समोरच्या अडचणी वाढल्या आहे. आदर्श घोटाळ्याच्या आरोप पत्रात अशोक चव्हाण यांचं नाव आधीच सीबीआयने दाखल केल होतं. आता अशोक चव्हाणांच्या विरोधात खटला दाखल करण्याची परवानगी सीबीआयने राज्यपालांकडे मागितली आहे.

त्याला राजभवनच्या सूत्रांनीही दुजोरा दिलाय. क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या सेक्शन 197 अन्वये माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा असेल तर राज्यपालांची पूर्व संमती घ्यावी लागते.

त्यानुसार सीबीआयने राज्यपालांकडे अशोक चव्हाणांच्या विरोधात खटला दाखल करण्याची परवानगी मागितली. सीबीआयच्या या अर्जावर अजून राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नसल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2013 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close