S M L

हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

Samruddha Bhambure | Updated On: Dec 9, 2013 11:30 AM IST

Image img_225652_nagpuradhiveshan456_240x180.jpg09 डिसेंबर : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. या अधिवेशनात जादूटोणाविरोधी विधेयक संमत करण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला आहे. पण आदर्श अहवाल, वीज, सिंचन घोटाळा, कायदा आणि सुव्यवस्था या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यावर निवडणुकीच्या निकालाचे सावट असणार आहे.

नागपूरच्या गुलाबी थंडीत राज्य विधीमंडळाचे अधिवेशन रंगणार असून थंडीच्या माहोलमध्ये विधीमंडळात विविध विषयांवर गरमागरम चर्चा रंगतील. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं जादूटोणाविरोधी विधेयक या अधिवेशनात संमत करण्याची पूर्ण तयारी राज्य सरकारने केली आहे.

या अधिवेशनावर पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालांचे सावट निश्चित असेल. म्हणूनच विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे.

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनत हे मुद्दे गाजणार :

  • दाभोलकरांच्या हत्येच्या तपासातले अपयश
  • आदर्श अहवालापासून सरकारनं काढलेला पळ
  • विदर्भातला ओला दुष्काळ
  • सिंचन घोटाळा
  • वीज घोटाळा
  • प्रादेशिक असमतोलाबद्दल डॉ. विजय केळकर समितीचा अहवाल
  • मानव निर्देशांकातील राज्याची घसरण

अशा विविध मुद्द्यांवर सरकारची कसोटी लागणार असली तरी सरकारनेही आपली तयारी पूर्ण केली आहे.

विरोधकांनी आधीच अधिवेशन दोन आठवड्यांनी वाढवण्याची मागणी लावून धरलीे असून आता अधिवेशनात विदर्भातील जनतेच्या पदरात काय पडते हे पाहणे ही तितक च महत्त्वाच ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2013 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close