S M L

अण्णा 'बॅक इन अ‍ॅक्शन'!

Sachin Salve | Updated On: Dec 10, 2013 09:23 AM IST

अण्णा 'बॅक इन अ‍ॅक्शन'!

anna lokpal09 डिसेंबर : भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन पुकारुन अख्ख्या देशाला खडबडून जागे करणारे अण्णा हजारे मंगळवारी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे. यावेळीही तोच मुद्दा आहे लोकपाल विधेयक. अण्णा हजारे मंगळवारपासून आपल्या गावी राळेगणसिद्धीत बेमुदत उपोषणला बसणार आहे.

जोपर्यंत सरकार विधेयक मांडत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा अण्णांनी दिलाय. मंगळवारी सकाळी राळेगणमध्ये प्रभातफेरीचं आयोजन करण्यात आलंय. त्यानंतर यादव बाबा मंदिरात 11 वाजता अण्णा उपोषणाला सुरूवात करणार आहे. जनता काँग्रसेवर नाराज आहे हे विधानसभांच्या निवडणुकांमुळे सिद्ध झालंय. त्यामुळे आता लोकांना नवा पर्याय हवा आहे. लोकपाल बाबत पंतप्रधानांनी लेखी आश्वासन देऊनसुद्धा सरकारनं कायम आमचा विश्वासघात केलाय अशी टीका अण्णांनी केलीय.

अण्णांनी या अगोदरही तीन वेळा लोकपालसाठी उपोषणाला बसले होते. दिल्लीत अण्णांनी दोन वेळा आंदोलन केले तर मुंबईत मागिल वर्षी एमएमआरडीए मैदानात आंदोलन केलं होतं. अण्णांच्या आंदोलनाची दखल घेऊन लोकपाल विधेयक लोकसभेत सादरही झालं. ते पुढे राज्यसभेतही गेलं पण प्रत्यक्षात लोकपाल आलंच नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर अण्णांनी पुन्हा एकदा उपोषणास्त्र उपसले आहे. पण यावेळी अण्णांचे उपोषण आपल्या गावी राळेगणसिद्धीत आहे. मुंबईत झालेल्या आंदोलनात फारशी गर्दी जमू शकली नव्हती त्यामुळे अण्णांना तब्येतीच्या कारणास्तव आंदोलन मागे घ्यावे लागले होते. आता अण्णांचे आंदोलन 'होम पिच'वर आहे. त्यामुळे या आंदोलनाची सर्वात पहिले राज्य सरकार कशी दखल घेते हे पाहण्याचे ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2013 11:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close