S M L

नाशिकमध्ये भरलं चित्रमहर्षीच्या सिनेमांचं प्रदर्शन

16 फेब्रुवारी, नाशिक दीप्ती राऊत दर आठवड्याचा नवीन विषय. दर वर्षाचा नवीन चेहरा.. कोट्यवधींची गुंतवणूक आणि कोट्यवधींच्या मनावरही गारूड... आज आपला हिंदी सिनेमा जगभर प्रसिद्ध झालाय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतात सिनेमाची मूहूर्तमेढ रोवली ती दादासाहेब फाळके यांनी. 16 फेब्रुवारी हा दिवस दादासाहेब फाळके यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं नाशिकमध्ये दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटाचं प्रदर्शन नाशिकमध्ये भरलं होतं. राजा हरिश्चंद्रापासून दादासाहेबांचा चित्रपट निर्मितीचा प्रवास सुरू झाला. मोहिनी भस्मासूर, सत्यवान सावित्री, लंकादहन या पौराणिक मूकपटांपासून म्युनिसिपल निवडणुका, कबीर कमाल असा अनेक अंगांनी तो प्रवास बहरला. तब्बल 53 चित्रपटांचं दिग्दर्शन आणि 30 लघुपटांची निर्मिती फाळकेंनी केली. अंत्यत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत भारतीय चित्रपट घडवला. भारतीय चित्रपटसृष्टीच्या या जनकाच्या 65 वा स्मृतिदिनानिमित्त नाशिकमधल्या फाळके स्मारकात त्यांच्या चित्रपटांचं प्रदर्शन भरलं होतं. हे प्रदर्शन पाहण्यासाठी सिनेप्रेमी आले होते. या प्रदर्शनाविषयी फाळके फिस्म सोसायटीचे सक्रीय कार्यकर्ते आणि फिल्म अभ्यासक रघुवीर फडणीस सांगतात, " फाळकेंनी जे काम केलंय त्यांच्या कर्तृत्वावरच भारतीय चित्रपटसृष्टीचा डोलारा उभा आहे. आज त्यांची स्मृती जतन करण्यासाठी एक अभ्यासकेंद्र गरजेचं आहे. आज एवढ्या मोठ्याप्रमाणावर चित्रपट बनवले जातात, लोकांपर्यंत पोहोचवले जातात.. पण त्याचा अभ्यास होत नाही. पुणे विद्यापिठानं किंवा मुक्त विद्यापिठानं पुढाकार गेतला तर नाशिकमध्ये फाळकेंच्या नावंनं एक अध्यासन होवू शकतं. जी नवीन पिढी आहे तिला बरोबर घेवून... ते चित्रपट बघतोत... पण तो कसा बघायचा, त्याचा आपल्या जीवनात काय स्थान आहे हे तेव्हाच जास्त रिलेव्हंट ठरेल." खरंय. फाळकेंचा वारसा आपण सांगतो. पण त्यांचा वसा पुढल्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर असा फिल्म अप्रेसीएशन कोर्स किंवा अभ्यासकेंद्र नाशिकमध्ये किंवा भारतात व्हायला हवं असंच सर्व सीनेरसिकांचं म्हणणं आहे. दादासाहेब फाळके यांचं चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 16, 2009 11:25 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2009 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close