S M L

अण्णांचा उपोषणाला 'आप'चा ताप !

Sachin Salve | Updated On: Dec 13, 2013 07:04 PM IST

अण्णांचा उपोषणाला 'आप'चा ताप !

anna vs aap13 डिसेंबर : लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस. पण उपोषणात 'आप'चा ताप वाढत चालल्यामुळे वादाचे निखारे पेट घेत आहे. माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग आणि 'आप'चे सदस्य गोपाल राय यांच्यात झालेल्या वादामुळे खुद्द अण्णांना हस्तक्षेप करावा लागला. अण्णांनी थेट गोपाळ राय यांना 'चालते व्हा' म्हटल्यानंतर गोपाल राय यांना राळेगण सोडावे लागले.

अण्णांच्या उपोषणाच्या निमित्तानं त्यांच्या आधीच्या आणि आताच्या सहकार्‍यांमध्ये असलेले मतभेद अगदी स्पष्टपणे उघड झाले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर अण्णांच्या व्यासपीठाचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे. राळेगणसिद्धीमध्ये अण्णांना भेटायला गेलेल्या माजी लष्करप्रमुख व्ही के .सिंग यांच्या भाषणात आपच्या कार्यकर्त्यांनी अडथळा आणला.

अण्णांच्या आंदोलनामध्ये आत्तापर्यंत अनेकजण सहभागी झाले आणि बाजूलाही गेले त्यातले जे काही बाजूला गेले ते आमच्यामुळेच अण्णा इथपर्यंत पोहचले असा दावा करतात अशी टीका सिंग यांनी केली होती. सिंग यांच्या वक्तव्यावर आम आदमी पार्टीचे सदस्य गोपाळ राय यांनी आक्षेप घेतला.

आम्ही अण्णांच्या आंदोलनात पहिल्यापासून सहभागी आहोत. मात्र काही लोक एककीकडे अण्णांचे समर्थक म्हणतात तर दुसरीकडे लोकसभेच्या तिकिटासाठी नरेंद्र मोदींच्या घरी ये जा करतात अशी टीका राय यांनी केली. आज हा वाद चांगलाच चिघळला. त्यामुळे खुद्द अण्णांनी हस्तक्षेप करत गोपाल राय यांना खडे बोल सुनावले. तुम्हाला राळेगणमध्ये उपोषण करण्याची गरज नाही. तुम्हाला अगोदरही सांगण्यात आलंय. तुम्ही इथून निघून जावे, तुम्हाला जिथे वाटेल तिथे मग उपोषणाला बसा अशा शब्दात अण्णांनी राय यांना फटकारले. अण्णांनी सुनावल्यानंतर राय यांनी उपोषण स्थळ सोडून राळेगणमधून बाहेर पडले. सध्यातरी या वादावर पडदा पडलाय. मात्र या आपच्या सदस्यांच्या 'झाडू'गिरीमुळे अण्णांचे उपोषण वेगळ्याचं चर्चेमुळे काळवंडले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 13, 2013 07:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close