S M L

एमएमआरडीएच्या पुनर्वसन अधिका-याची बदली

17 फेब्रुवारी, मुंबई अलका धुपकर एमएमआरडीएच्या पुनर्वसन अधिकारी वंदना सूर्यवंशी यांची अखेर बदली झालेय. रेल्वे झोपडपट्टी संघर्ष समितीचे कार्यकर्ते संतोष सूर्यवंशी यांनी आत्महत्या करताना लिहिलेल्या शेवटच्या चिठ्ठीत सूर्यवंशी यांना जबाबदार ठरवलंय. आयबीएन लोकमत कालपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करतंय. त्यानंतर पुनर्वसन अधिकारी वंदना सूर्यवंशी यांची बदली करण्यात आलीये. आयबीएन लोकमतने काल सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी हे सर्व आरोप त्यांनी फेटाळले होते. पण अखेर आज त्यांची बदली करुन एमएमआरडीएने एकप्रकारे आंदोलकांच्या आरोपांत तथ्य असल्याचंच दाखवून दिलंय.उपजिल्हाधिकारी अजित साखरे यांना देण्यासाठी वंदना सूर्यवंशी यांनी भोसलेंकडून दोन ऑक्टोबर 2008 ला दोन लाख रुपये घेतले होते. पी. एस. शर्मा, सीडीओ, एमएमआरडीए यांना देण्यासाठी सूर्यवंशी यांनी 18 नोव्हेंबर 2008 ला तीन लाख रुपये घेतले. बोगस प्रकल्पग्रस्तांची आयडी बनवून करोडो रुपये कमावण्यात एमएमआरडीचे आयुक्त रत्नाकर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त मिलिंद म्हैसकर आणि पूर्नवसन अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी रेल्वे पुनर्वसन समितीचे अध्यक्ष,चांगदेव वानखेडे, यांनी केली होती.संतोष भोसले हे प्रकल्पग्रस्तांना घरं मिळवून देण्यासाठी एमएमआरडीचे एजंट म्हणून काम करत होते. प्रत्येक प्रकल्पग्रस्तांमागे लाखो रुपयांची लाच एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांना देण्याचं काम भोसले करत होते, असं त्यांनी आत्महत्येच्यावेळी लिहिलेल्या चिठ्ठीतच म्हटलंय. पुनर्वसनाच्या कामासाठी एमएमआरडीमध्ये दलाल काम करतात, याचाच हा एक पुरावा आहे.आत्महत्येच्यावेळी लिहिलेल्या चिठ्ठीत भोसले म्हणतात, भक्ती पार्क, इंडियन ऑईल नगर, शास्त्रीनगर वाशीनाका आणि लल्लूभाई कंपाउंडमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांना घरं देण्यात आलीयत, सूर्यवंशी यांना पाच जानेवारीला आठ लाख रुपये प्रकल्पग्रस्तांतर्फे देण्यात आले, बीकेसीमधल्या रुमसाठी सूर्यवंशी यांना भोसलंेनी 22 जानेवारीला तीन लाख रुपये दिले, मानखुर्द इंडियन ऑईल नगरच्या घरांसाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांची लाच सूर्यवंशीनी मागितली. हे पैसे प्रत्येकी दीड लाख पर्यंत कमी करा, अशी भोसले यांची मागणी होती. त्यावरुनच दोघांमध्ये खटके उडाले होते. MMRDA ऑफिसबाहेर एजंट लाच घेतात. त्यांनाच ऑफिसमध्ये अलॉटमेंट पत्रं दिली जातात. असंही या पत्रात नमूद करण्यात आलंय. सूर्यवंशी यांच्यासाठी 15 दलाल काम करतात.संतोष भोसले यांनी आत्महत्येच्या वेळी लिहिलेल्या या चिठ्ठीत एमएमआरडीएच्या पुनर्वसन अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्याचबरोबर एमएमआरडीएच्या अन्य अधिकार्‍यांवरही आरोप केलेयत.हे आरोप म्हणजे उपजिल्हाधिकारी अजित साखरे यांना देण्यासाठी वंदना सूर्यवंशी यांनी भोसलेकडून दोन ऑक्टोबर 2008 ला दोन लाख रुपये घेतले होते. एम.एम.आर.डी.ए चे सीडीओ पी. एस. शर्मा यांना देण्यासाठी सूर्यवंशी यांनी 18 नोव्हेंबर 2008 ला तीन लाख रुपये घेतले. बोगस प्रकल्पग्रस्तांची ओळखपत्रं बनवून करोडो रुपये कमावण्यात एमएमआरडीचे आयुक्त रत्नाकर गायकवाड, अतिरीक्त आयुक्त मिलिंद म्हैसकर आणि पुर्नवसन अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचा हात आहे. त्यामुळे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी व्हावी. अशी मागणी केली जात आहे. याआधीही 25 नोव्हेंबर 2008 मध्ये कुर्ला ताराबाई कंपाउंडमध्ये एमएमआरडीए अतिक्रमणं हटवत असताना शंकर भल्ला या नागिकाराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणीही एमएमआरडीएचे आयुक्त रत्नाकर गायकवाड, अतिरीक्त आयुक्त मिलिंद म्हैसकर आणि पुनर्वसन अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यावर एक सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2009 11:59 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2009 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close