S M L

पुण्यात अबू आझमींच्या सभेत गुंडाची हजेरी

17 फेब्रुवारी, पुणे अद्वैत मेहता, सिद्धार्थ गोदाम समाजवादी पार्टीच्या अबू आझमी यांनी " महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करून मनसेला गुंडा पार्टी घोषित करा, " अशी मागणी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली. पण दिव्याखाली अंधार याची प्रचिती यावेळी आली. कारण या पत्रकार परिषदेवेळी अबू आझमी यांच्याबरोबर होता सोलापूरातील कुख्यात गुन्हेगार एम. डी. शेख. शेखवर दंगल माजवण्यासह खून, फसवणुकीचे डझनभर आरोप आहेत. राष्ट्रवादीबरोबर पूर्वी जवळीक असलेल्या शेखचे आझमींबरोबर गुफ्तगु पाहून आणखी एका वाल्याचा वाल्मिकी होणार अशी शक्यता निर्माण झालीये. 2002 साली सोलापूरमध्ये जातीयवादी दंगल झाली होती. त्या दंगलीचा म्होरक्या एम. डी. शेख होता. भडकवणारी भाषणबाजी करून दोन समाजातल्या लोकांमध्ये त्यांनं प्रचंड हलकल्लोळ माजला होता. त्या गुन्ह्याप्रकरणी एम.डी. शेखला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सोलापूरचे शिवसेनेचे विभाग प्रमुख चंद्रकांत मेहत्रे यांच्या खुनाच्या आरोपाखाली शेखला पोलिसांनी अटक केली होती. लोकांना दादागिरी करणं, धमकावणी करणं हेही गुन्हे त्याच्यावर आहेत. बाबा बोडके आणि आता एम.डी. शेख यांचा राजकीय पक्षांभोवतालचा वावर पाहता राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतंय की काय ही भीती वाढू लागली आहे. तो पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक गटाचा सदस्य आहे. आगामी लोकसभा निवडणुकांत राष्ट्रवादी किंवा समाजवादी पक्ष या दोन्ही पैकी एका पक्षाचं तिकीट मिळवावं ही एम. डी. शेखची इच्छा आहे. वाल्याचा वाल्मिकी होण्यासाठी गुन्हेगारांना राजकीय पक्षांचीच का गरज भासते, असा प्रश्न सर्वसामन्य जनतेतून विचारला जात आहे. आम्ही गुंडांना निवडून देणार नाही, असं पुण्यातल्या जनतेनं म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2009 01:33 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2009 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close