S M L

मारहाण प्रकरणी अरमान कोहलीला अटक

Samruddha Bhambure | Updated On: Dec 17, 2013 02:00 PM IST

मारहाण प्रकरणी अरमान कोहलीला अटक

arman17 डिसेंबर : 'बिग बॉस'च्या घरात प्रत्येक पर्वात काही ना काहीतरी वादविवाद होत असतात. यंदा 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वात ब्रिटनचे नागरिकत्व असलेली सुपर मॉडेल सुफिया हयात हिने आपला प्रतिस्पर्धी अभिनेता अरमान कोहलीवर मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.

हयात हिने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सांताक्रूझ पोलिसांकडे आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लोणावळा पोलिसांनी रात्री उशिरा 'बिग बॉस'च्या घरातून अरमान कोहलीला अटक केली. अरमान कोहलीला आज दुपारी वडगाव-मावळ कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे.

 'बीग बॉस'च्या सातव्या पर्वात सोफिया हयात आणि अरमान कोहली यांच्यातील वादाने  रंगत आणली असताना या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.  अरमान आणि सोफिया या दोघांमध्येही नेहमीच भांडणे होताना दिसत होती. अशाच एका वादावादीदरम्यान चिडलेल्या अरमानने सोफियाला झाडू फेकून मारला. गेल्या आठवडय़ात सोफियाला बीग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर तिने सांताक्रुझ पोलिसांत अरमानविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2013 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close