S M L

काळसेकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

Samruddha Bhambure | Updated On: Dec 18, 2013 08:04 PM IST

काळसेकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

kolsekar18 डिसेंबर : 2013च्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा झालीय. लोकवाङ्मय गृहने प्रकाशित केलेल्या सतिश काळसेकर यांच्या 'वाचणार्‍याची रोजनिशी' या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय. गोव्यातले लेखक तुकाराम रामा शेट यांना 'मनमोतया' या ललित लेखसंग्रहासाठी कोकणी भाषेतला पुरस्कार जाहीर करण्यात आलाय तर नामवंत कवी जावेद अख्तर यांना 'लाव्हा' या उर्दू काव्यसंग्रहासाठी पुरस्कार देण्यात आलाय.

साठच्या दशकात उदयाला आलेल्या लिटल मॅगझिन चळवळीत एक कवी आणि संपादक म्हणून सतिश काळसेकर यांचा सक्रिय सहभाग आहे. सकस साहित्य वाचताना आलेले समृद्ध अनुभव काळसेकर यांनी या पुस्तकात लिहिले आहेत. डिसेंबर 2003 ते जानेवारी 2009 या काळात लिहिले गेलेले लेख या पुस्तकात आहेत. नियतकालिकं, अनियतकालिकं, वर्तमानपत्रं, कविता, कथा, कादंबरी, दिवाळी अंक या आणि अशा अनेक साहित्याविषयी खूप माहिती यात आहे. मराठी, हिंदी, इंग्लिशमधल्या अनेक लेखक- कवी- अभ्यासकांची ओळख या रोजनिशीमधून होते.

साहित्य अकादमी पुरस्कार, 2013

- 'वाचणार्‍याची रोजनिशी' साठी सतिश काळसेकर

- 'मनमोतया' या कोकणी ललित लेखसंग्रहासाठी तुकाराम रामा शेट

- 'लाव्हा' या उर्दू काव्यसंग्रहासाठी जावेद अख्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2013 06:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close