S M L

'आदर्श' प्रकरणी अशोक चव्हाणांना दिलासा

Samruddha Bhambure | Updated On: Dec 18, 2013 06:44 PM IST

Image img_135542_aadarsh352345_240x180.jpg18 डिसेंबर :  आदर्श प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिलासा मिळालाय. आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी सीबीआयनं केलेला विनंती अर्ज राज्यपालांनी फेटाळलाय. या प्रकरणात अशोक चव्हाण यांना सीबीआयने याआधीच आरोपी केलं होतं. त्यानंतर गेल्या महिन्यात सीबीआयनं राज्यपाल के शंकरनारायणन यांच्याकडे अशोक चव्हाण यांच्याविरूध्द न्यायलयात खटला चालवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती.

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये आजी-माजी मंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्याविरोधात न्यायालयात खटला चालवायचा असेल तर राज्यपालांची पूर्वसंमती लागते. त्यानुसार सीबीआयने हा विनंती अर्ज केला होता. पण राज्यपालांनी सीबीआयचा हा विनंती अर्ज फेटाळला आणि अशोक चव्हाणांच्या विरोधात न्यायालयात खटला चालवण्याची परवानगी सीबीआयला नाकारली अशी माहिती सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिलीय.

दरम्यान, सीबीआयच्या आरोपपत्रातून आपलं नाव वगळण्यात यावं, अशी विनंती याचिका अशोक चव्हाणांनी आधीच मुंबई हायकोर्टात दाखल केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2013 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close