S M L

'आदर्श' अहवाल शुक्रवारी पटलावर

Samruddha Bhambure | Updated On: Dec 19, 2013 08:38 PM IST

Image img_195682_adarsh_240x180.jpg19 डिसेंबर : आदर्शचा अहलवाल उद्या विधानसभेत मांडण्यात येणार आहे. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर हा अहवाल मांडण्यात येईल. जे. ए. पाटील न्यायालयीन आयोगाचा हा अहवाल असून या अहवालामुळे अधिकारी अडचणीत येतील. पण नेत्यांवर मात्र थेट ठपका ठेवण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

या अहवालाच्या 800 प्रती तयार आहेत. ऍक्शन टेकन रिपोर्टसह हा अहवाल मांडण्यात येईल. पण या अहवालावर चर्चा मात्र होणार नाही, असं समजते. काही मुख्यमंत्र्यांवर थेट ठपका ठेवण्यात आला नसला तरी त्यांच्यावर अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 19, 2013 07:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close