S M L

'आदर्श'चा अहवाल विधानसभेत सादर

Samruddha Bhambure | Updated On: Dec 20, 2013 02:27 PM IST

Image img_152952_aadarshsocity_240x180.jpg20 डिसेंबर : वादग्रस्त आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्याची चौकशी करणारा न्यायालयीन समितीचा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडला गेला असून त्यावर मुख्यमंत्र्यांचे निवेदन सुरू झाले आहे. शुक्रवारी सकाळी राज्य मंत्रिमंडळाने हा अहवाल फेटाळला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या अहवालातील शिफारसी मान्य नसल्याने तो फेटाळण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने न्यायाधीश जे. ए. पाटील आणि माजी मुख्य सचिव सुब्रमण्यम यांच्या अध्यतेखाली समितीने हा अहवाल सादर केला होता.

आदर्श सोसायटी घोटाळ्याचा अहवाल नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मांडण्या आधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि यात अहवालातला मुख्य भाग फेटाळण्यात आला. या अहवालातला फक्त पहिला खंड अधिवेशनात मांडला असून तेवढाच खंड सरकार स्वीकारेल, असं कळतंय.

आदर्शवर चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांनी सभात्याग केला होता. याप्रकरणी सरकार दोषींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.विरोधकांनी आज आदर्शची प्रतिकात्मक बिल्डिंग पाडून याचा निषेध व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2013 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close