S M L

मोदी यांचा मेणाचा पुतळा !

Samruddha Bhambure | Updated On: Dec 22, 2013 02:20 PM IST

modi22 डिसेंबर : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मेणाचा पुतळा बनवण्यात आलाय. अण्णा हजारे यांचा मेणाचा पुतळा बनवणारे कलाकार संदीप कोंडुलू यांनी हा पुतळा बनवलाय. स्वत: नरेंद्र मोदींनी या पुतळ्याचं अनावरण केलं. आपल्या अपेक्षेपेक्षाही हा पुतळा चांगला झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.

या वेळी भाजरचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग देखील उपस्थित होते. आता हा पुतळा कोंडुलू यांच्या लोणावळ्यातल्या संग्रहालायत ठेवण्यात येणार आहे.

मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील भव्य मैदानात होणाऱ्या 'महागर्जना' सभेसाठी मोदी यांचे आगमन झाले आहे. या सभेसाठी मुंबई भाजपतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोदींना असलेला धोका लक्षात घेता त्यांच्यासाठी सात स्तरांची सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2013 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close