S M L

शिवसेनेविनाच भाजपची 'महागर्जना'

Sachin Salve | Updated On: Dec 23, 2013 08:34 PM IST

modi11प्रफुल्ल साळुंखे, मुंबई

23 डिसेंबर : मुंबई बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एमएमआरडीए मैदानावर भाजपने जंगी सभा घेतली. एरवी शिवसेनेशिवाय मुंबईत पान न हलणार्‍या भाजपने ही सभा एकट्याच्या बळावर यशस्वी करुन दाखवली. या खास सभेत शिवसेनेच्या नेत्यांना डावलण्यामागे काय कारणे आहेत, ही भाजपची नव्या समीकरणांची नांदी आहे का असा सवाल उपस्थित होतोय.

रविवारी मुंबईत झालेल्या भाजपच्या सभेत नमो नम:चा नारा आणि लाखोंचा जनसमुदाय चित्र होतं. एरवी मुंबईत शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजपला लाखांची गर्दी जमवणे शक्य नसतं. ही सभा त्याला अपवाद ठरली. मात्र त्याचवेळी मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर झालेल्या या सभेत शिवसेनेला साधं आमंत्रणही देण्यात आलं नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेची ताकद कमी होतेय. त्यामुळे आता नवीन मित्र शोधण्यासाठी किंवा स्वतःची ताकद वाढवण्यासाठी भाजप सेनेपासून दूर जातोय.

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीत शिवसेनेची ताकद कमी झाली, तर भाजप-शिवसेना युतीची ही शेवटची निवडणूक ठरेल हे सांगायला राजकीय विश्लेषकाची गरज नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2013 08:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close