S M L

संजय दत्तच्या घराबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची नारेबाजी

Samruddha Bhambure | Updated On: Dec 26, 2013 10:40 PM IST

sanjay dutt and manyata26 डिसेंबर :  अभिनेता संजय दत्तची पॅरोलवर महिन्याभरासाठी सुटका झाल्यामुळे, आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (एबीवीपी)च्या कार्यकर्त्यांनी त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील बंगल्याबाहेर जोरदार निदर्शने केली. यावेळी 'संजय दत्त तु ने क्या किया? देश का नाम बदनाम किया' अशी जोरदार नारेबाजी एबीव्हीपी कार्य़कर्त्यांनी केली.

पत्नी मान्यताची प्रकृती ठीक नसल्याच्या कारणावरून संजय दत्तने सुट्टीचा अर्ज केला होता. यावर त्याला ३० दिवसांची सुटी म्हणजेच पॅरोल रजा मंजूर झाली. त्यानंतर संजय दत्तच्या पॅरोलवर विविध स्तरातून टीका झाली होती. त्यातच गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या पॅरोलची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर काय झाले, हे कळण्याआधीच संजय दत्त तुरुंगाबाहेर पडला. सध्या संजय दत्त त्याच्या वांद्र्यातील निवासस्थानी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2013 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close