S M L

मनसे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचे निधन

Samruddha Bhambure | Updated On: Dec 26, 2013 10:40 PM IST

मनसे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचे निधन

226 डिसेंबर : मनसेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचे आज गुरूवारी हृदयविकार्‍याच्या धक्क्याने निधन झाले. छातीत दुखू लागल्याने अतुल सरपोतदार यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उद्या 11 वाजता खेरवाडी स्मशानभूमित त्यांच्यावर  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

अतुल सरपोतदार यांचे वडील मधुकर सरपोतदार शिवसेनेचे नेते होते. अतुल सरपोतदार यांनी मनसेत प्रवेश केल्यानंतर पक्षवाढीसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सरपोतदार यांच्या निधनाने मनसेला धक्का बसला आहे. 'त्यामुळे राज ठाकरे यांच्या पक्षातला एक निष्ठावंत कार्यंकरता निघून गेला' अशा शब्दात मनसे नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

शिवसेनेचे दिवंगत नेते मधुकर सरपोतदार यांचे चिंरजीव अतुल सरपोतदार हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय विद्यार्थी सेनेत कार्यरत होते. अतुल सरपोतदार यांनी मनसेत प्रवेश केल्यानंतर पक्षवाढीसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2013 08:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close