S M L

पार्किंगचा प्रश्न पेटणार?

Samruddha Bhambure | Updated On: Dec 27, 2013 03:08 PM IST

पार्किंगचा प्रश्न पेटणार?

27 डिसेंबर : मुंबई महापालिकेने पार्किंगचा नवा प्रस्ताव सुधार समितीमध्ये मंजूर केला आहे. त्यानुसार आता मुंबईकरांना रस्त्यावर गाड्या उभ्या करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. याबाबत आज सर्वसाधारण सभा होणार आहे. सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर झाला तर पार्किंगसाठी पूर्वीपेक्षा तिप्पट पैसे मोजावे लागतील. पार्किंगच्या या नव्या धोरणाला विरोधकांनी विरोध करत सभात्याग केला.

सध्या गाड्यांच्या किंमती काही लाखात असल्यामुळे कार स्वस्त झाल्या आहेत. पण पार्किंगसाठी खिशाला कात्री लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीने पार्किंगसाठीचा नवा प्रस्ताव मंजूर केला आहे. शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हा प्रस्ताव मंजूर करू इच्छिते, तर काँग्रेसने याला विरोध केला आहे. मनसेने केलेल्या प्रस्तावातील सूचना मान्य न केल्यामुळे मनसेही याचा विरोध करणार आहे. त्यामुळे आजची महापालिकेची सभा वादळी ठरणार आहे. जागा कमी असल्यामुळे मुंबईत पार्किंगचा प्रश्न लोकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे.

निवासी वाहनतळासाठीचे मासिक दर

           चार चाकी              दुचाकी

  • जास्त वर्दळीच्या ठिकाणी            1800                        750
  • वर्दळीच्या ठिकाणी                      1200                        500
  • कमी वर्दळीच्या ठिकाणी                600                        250

तर वाहनतळात तासाभरासाठी गाडी पार्क करायला

  चारचाकी             दुचाकी   

  • 1 तासासाठी                                       20                       5
  • 1 ते 3 तासांसाठी                                25                     15
  • 3 ते 6 तासांसाठी                                35                     20

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2013 01:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close