S M L

ज्येष्ठ अभिनेते फारुख शेख कालवश

Samruddha Bhambure | Updated On: Dec 28, 2013 03:15 PM IST

ज्येष्ठ अभिनेते फारुख शेख कालवश

Farooq-Shaikh28 डिसेंबर : ज्येष्ठ अभिनेते फारुख शेख यांचं काल रात्री दुबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

'शतरंज के खिलाडी', 'नूरी', 'चष्मे बद्दूर', 'किसी से ना केहना', 'उमराव जान' अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवला. 'जीना इसी का नाम है' या कार्यक्रमातून त्यांनी सिनेसृष्टीतल्या अनेक कलावंतांना बोलतं केलं तर 'तुम्हारी अमृता' यासारख्या नाटकातला त्यांचा अभिनयही वाखाणला गेला.

फारुख शेख यांचा जन्म 25 मार्च 1948 मध्ये झाला. बॉलीवूडमधलं 70-80 चं दशक गाजवणारे फारुख 65 वर्षांचे होते. ते सध्या दुबईत राहत होते. आज रात्रीपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मुंबईत आणलं जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 28, 2013 03:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close