S M L

महिला आयोगाच्या अध्यक्षांचं नाव मंगळवारी जाहीर

Sachin Salve | Updated On: Dec 30, 2013 11:08 PM IST

Image img_232392_mahilayoug3423_240x180.jpg30 डिसेंबर : राज्य महिला आयोगाला अखेर चार वर्षांच्या कालावधीनंतर अध्यक्ष मिळणार आहे. नव्या अध्यक्षांचं नाव उद्या मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे.

अध्यक्षपदासाठी चार नावं चर्चेत आहेत. मुंबईच्या ऍड. सुशीबेन शाह यांचं नाव चर्चेत आहे, त्यांच्याशिवाय चंद्रपूरच्या ऍड.विजया भांगडे, जळगावच्या ललिता पाटील, कोल्हापूरच्या सरला पाटील यांच्याही नावावर विचार झाल्याचं सूत्रांनी 'आयबीएन लोकमत'ला सांगितलं.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात आज संध्याकाळी बैठक झाली. त्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबद्दल तसंच महामंडळांच्या नियुक्तांबद्दल निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर आदर्श रिपोर्टचा विषय येत्या गुरुवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला घेण्याचा निर्णय झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2013 11:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close